Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर इमारतीवर पडल्याने झालेली दुर्घटना ही नैसर्गिक आपत्तीच आहे. मात्र, इमारतीचे स्ट्रक्चर, कचरा डेपो आणि इमारतीमध्ये अंतर योग्य होते का, या सगळ्यांची बचाव कार्यसंपल्यानंतर त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी केली जाईल. यात कोणी दोषी असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. दुसरीकडे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी या घटनेच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात आंदोलन सुरु केले आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, आठ जुलै रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून शोधकार्य राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यात बराच वेळ गेला आहे. त्रयस्थ व्यक्तींना शोधकार्य मंदावले असल्याचे वाटत आहे. परंतु, शोधकार्य मंदावले नाही. कठीण शोधकार्य आहे. कोसळलेल्या इमारतीमधील छोट्या खोलीत (पॅन्ट्री) आठ लोक अडकले आहेत. त्यासाठी कचरा बाजूला करावा लागत आहे.

आता इमारत खोलली जाणार आहे. त्यातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नातेवाईकांची भावना समजू शकतो. नातेवाईकांना धीर दिला आहे. १२ मशीनच्या माध्यमातून कचरा हटविला जात आहे.

नवीन दहा मशीन आणल्या आहेत. परिस्थितीनुसार बचावकार्य राबविण्यात येत आहे. पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरील दोन्ही स्लॅप एक झाले आहे. बचावकार्य अतिशय कठिण झाले आहे. येथे कचरा असल्याने मिथेन गॅस तयार होत आहे. त्यामुळे अडचण येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version