Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील घनकचरा डेपो परिसरात घडलेल्या अत्यंत वेदनादायी दुर्घटनेनंतर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेत संबंधित अधिकारी व यंत्रणांशी चर्चा केली.

त्यानंतर त्यांनी बाधित कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्यांच्या डोळ्यांतील वेदना, चिंता आणि आपल्या माणसाच्या सुखरूप परत येण्याची आशा मनाला हेलावून टाकणारी होती. त्यांच्याशी संवाद साधत या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास उपमहापौर बाबर यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांच्या समवेत नगरसदस्या योगिता नागरगोजे,विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.

महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस, सैन्यदल तसेच इतर सर्व यंत्रणा अहोरात्र आणि युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version