Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे महामंत्री मधुकर बहिरू बच्चे यांची पक्षाच्या शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मध्यवर्ती पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

यावेळी सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कार्यालय प्रमुख संजय परळीकर, मनोज ब्राह्मणकर, विशाल वाळुंजकर, अजय पाताडे, संतोष तापकीर, प्रदीप बेंद्रे, जोशना कलाटे, मनीष पंजाबी, हर्षदा मोरे, राजश्री शहा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मधुकर बच्चे यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version