Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घरकुल परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून एक भावनिक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी हातात अजित पवारांचा फोटो घेत घरकुलमधील नागरिकांच्या व्यथा मांडत भावनिक साद घातली आहे.

व्हिडिओमध्ये मारुती जाधव म्हणतात, “दादा, तुम्ही इथे असता तर प्रशासन अवघ्या २४ तासांत खडबडून जागे झाले असते. आज घरकुलमधील नागरिकांना वारंवार पाणी तुंबणे, ड्रेनेजचे पाणी घरात शिरणे आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही जणू पोरके झाल्यासारखे वाटत आहोत. आमच्या वेदना ऐकणारे आणि कायमस्वरूपी न्याय देणारे कोणी तरी हवे आहे.”
घरकुल परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात अशाच संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मारुती जाधव यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ कोणावर टीका करण्यासाठी नाही, तर घरकुलमधील हजारो नागरिकांच्या वेदना आणि अपेक्षा अजितदादांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”
या भावनिक व्हिडिओची परिसरात चर्चा सुरू असून, घरकुलच्या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version