Spread the love

अतिवृष्टीचा इशारा: पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, शाळा बंद असल्या तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रशासकीय कामकाजासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि हवामान विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version