इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी, दिंडी प्रमुखांनी सुरक्षित ठिकाणीच थांबावे – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी व देहू येथील इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मंदिर परिसर आणि काही धर्मशाळांमध्ये पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच थांबण्याचे आवाहन केले आहे.
नदी, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या मार्गांवरून प्रवास करू नये तसेच पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतर आणि मार्ग मोकळे झाल्यावर पुढील प्रवासाबाबत अधिकृत सूचना देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
