Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड
पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक शाखेचे प्रत्येक प्रभारी
अधिकारी यांनी आपआपले विभागामध्ये महिन्याच्या दर आठवडयामध्ये दर गुरूवारी “एक दिवस
शाळेसाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकुण २० टिमच्या
माध्यमातुन दर गुरूवारी २० शाळांमध्ये जावुन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघात
विषयी माहिती, व्यसनाधिनतेपासुन दुर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मिडियाचा वापर, स्त्रीया व
मुली यांचा सन्मान करणे इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

वाहतूक शाखेमार्फत अकराव्या टप्प्यात एकुण १९ टिमच्या माध्यमातुन, निवडलेल्या १९ शाळांमधुन सुमारे २९१५ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचुन त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन केले. “एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकुण आकरा टप्प्यामध्ये ५३७३६ विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणुस बनावे या दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.

वरील उपक्रम विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,  वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली  विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त,वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड,  भास्कर डेरे सहायक पोलीस आयुक्त – १ वाहतूक शाखा,
सतीश कसबे सहायक पोलीस आयुक्त – २ वाहतूक शाखा व वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व
अधिनस्थ अंमलदार यांचे मार्फतीने आज दि. १५/२/२०२४ रोजी यशस्वीरित्या पार पडला. उत्सफुर्त प्रतिसाद मिळणा-या या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा २२ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडणार आहे.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version