पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (५ जुलै) रोजी भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई चौक मित्र मंडळ आणि श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत सेक्टर ९, इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सकाळी १० ते ११ या वेळेत चैतन्य पार्क, सेक्टर क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक ८ मधील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता वैष्णोमाता मंदिर प्रांगणात प्रभाग क्रमांक ८ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
याशिवाय पताशीबाई लुंकड अंध शाळेत अन्नदान, शिधावाटप व फळवाटप, पांजरपोळ गोशाळेला चारा मदत तसेच गुळवे वस्ती येथील यशवंतराव आश्रम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
विलासभाऊ मडिगेरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान व समाजोपयोगी कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
