पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिला व बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मनसेच्या माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले यांनी स्वागत केले आहे.
“महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना कायद्याचा कडक धाक बसणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
तसेच शासन आणि न्यायव्यवस्थेने प्रलंबित असलेले अत्याचाराचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.”न्याय उशिरा मिळणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे,” असेही अश्विनी चिखले यांनी म्हटले.
