Spread the love

नसरापूर चिमुकली हत्याप्रकरणी आरोपीला फाशी; नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी निकालाचे केले स्वागत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.

या निकालाचे नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी स्वागत केले आहे. अशा कठोर शिक्षेमुळे भविष्यात अशा अमानुष घटनांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
समाजातील अशा गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही नगरसेविका काटे यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version