Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — चिंचवडगाव येथील केशवनगर परिसरात नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. आमदार जगताप यांच्या संकल्पनेतून व विकास निधीतून हे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे.

या लोकार्पण सोहळ्यास प्रभाग क्रमांक १८ मधील नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बॅडमिंटन कोर्टमुळे केशवनगर आणि परिसरातील क्रीडाप्रेमी, विशेषतः युवकांना खेळासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, नागरिकांच्या आरोग्यासाठी व युवा पिढीच्या क्रीडा विकासासाठी अशा सुविधांची आवश्यकता आहे. या कोर्टमुळे सर्व वयोगटातील नागरिकांना बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, चिंचवडगावातील लोंढेनगर येथील समाज मंदिर तसेच इतर विविध विकासकामांचे भूमिपूजनही आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये संरक्षण भिंत, ड्रेनेज पाईपलाईन आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे.

“चिंचवडगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि क्रीडा सुविधांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल,” असा विश्वास आमदार शंकरभाऊ जगताप यांनी व्यक्त केला.
या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version