Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला आणि रविवारी असल्याने सोमाटणे फाटा या भागातील अग्रवाल विद्या प्रसारक मंडळ संचालित गीता विद्यानिकेतन या महाविद्यालयात दिनांक २२ जुन रोजी  योग दिवस साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
योगासने प्राणायाम याचे मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील योग शिक्षक राजाभाऊ दुर्गे यांनी योग प्रात्याशीके करून योग अभ्यास कसा करावा हे दाखविले त्याच बरोबर योगा चे काय महत्त्व आहे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी योगा अतिशय उपयोगी व्यायाम आहे असे प्रतिपादन केले.तसेच या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदू भोगले  यावेळी २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय संस्कृतीत योगासने प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो असे म्हटले आणि २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला आणि २०१५ साली या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्या नंतर हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
  यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका रत्नालिकर आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कुलकर्णी, शिक्षीका पुजा भेगडे, प्रिया तांबे, दिपाली पाटील, अनिता प्रसाद, अस्मिता पाटील, तुषार शेळके सर आदी उपस्थित होते
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version