Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी योग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात पूजा चंदा, विक्रम चंदा, नेहा अस्थाना, संतोष मालविया, अमृता वेंगीनावार, प्रीती भामे, पंकज रोडे व संजय किसल यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने व ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनाली पतंगे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version