Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज),- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोहन नगर येथे नागरिकांसाठी विनामूल्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. योग, ध्यान आणि प्राणायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध योग अध्यापक महादेव येसके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणेचा सराव केला. यावेळी श्री. येसके यांनी योगाचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व सांगत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका अरुणा गणेश लंगोटे उपस्थित होत्या. त्यांनी मनोगतात महादेव मंदिर येथे नियमितपणे सुरू असलेल्या योग वर्गाचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आरोग्यासाठी योगाला जीवनशैलीचा भाग बनवावे, असे आवाहन केले.

या उपक्रमाचे आयोजन गणेश लंगोटे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग विद्या धामच्या साधकांनी विशेष परिश्रम घेतले.

नागरिकांच्या सहभागामुळे मोहन नगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version