Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २५ मधील नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या जनहिताच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती तसेच विविध शासकीय कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मोफत उपलब्ध करून देण्यात आला. शासनाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचाव्यात आणि आवश्यक कागदपत्रांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. शेकडो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक धर्मपाल तंदरपाळे, युवा नेते चेतन भाऊ भुजबळ, लक्ष्मीदीप सोसायटीचे चेअरमन रामभाऊ गावंडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय कोयते, अमोल डोंगरे, योगेश भोसले, किरण समिंदर, अविनाश शिरसाठ, संतोष भेंगळे, रजनीकांत वावळकर, विशाल वावळकर, रोहित पारदे, प्रमोद शिंदे, आप्पा माने यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणे अधिक सुलभ झाले. नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version