Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर सावरकर यांनी महाराष्ट्र रायफल असोसिएशन वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कप्तान एस. जे. एझिकेल मेमोरियल महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप या राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत ०.२२ कॅलिबर लॉग रायफल ५० मीटर प्रोन (पालथ्याने) या प्रकारात उत्कृष्ट नेमबाजी करत रौप्य पदक पटकावले. डॉ. सावरकर यांना राष्ट्रीय प्रशिक्षक शंतनू भिडे यांनी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी प्रा. डॉ. समीर सावरकर यांचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version