Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आज १४ जून रोजी पिंपरी-चिंचवड शहर मनसेतर्फे विविध लोकोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चिंचवड गाव येथील श्री मोरया गोसावी मंदिरात सर्व मनसैनिकांच्या उपस्थितीत राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना व अभिषेक करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या YCM हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी मनसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसरी-मोशी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या सर्व कार्यक्रमांना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शैलेश पाटील, राजू साळवे, आकाश सागरे, परमेश्वर चिल्लरगे, संतोष यादव, विक्रम भोसले, सुनील कदम, नारायण पठारे, महादेव लोखंडे, सागर बहुले, दत्ता डांगे, जितेश वाल्हेकर, चेतन कुलकर्णी, जयसिंग भाट, शाखाध्यक्ष विक्रम भोसले, चेतन कुलकर्णी, सुनिल कदम तसेच माझे मित्र सचिन परांडे, निलेश घुले , सचिन तुपे , सुधीर वाळके, निलेश डफळ यांच्यासह शेकडो मनसैनिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version