Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये सदस्यपदी बहुमताने आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त, भीमाशंकर देवस्थानचे माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास विठ्ठलराव ढगे पाटील यांची निवड झाल्याबद्दल मंगळवार, दिनांक ०९ जून २०२६ रोजी पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने नेहरूनगर न्यायालयातील सभागृहात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी व्यासपीठावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. नितीन पवार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक भटेवरा, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. जे के काळभोर आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना विकास ढगे पाटील यांनी, ‘पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा मी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोव्याच्या सदस्यपदी निवडून आलेला पहिलाच प्रतिनिधी आहे, या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो. पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनचा मी आजीव सभासद असून हे मला घराप्रमाणे आहे. मी स्वतःला या कुटुंबातील एक सदस्य मानतो. त्यामुळेच माझी बहुमताने निवड झाल्यावर सर्वात आधी मी इथे आलो आहे. बार असोसिएशनच्या आणि वकील वर्गाच्या कोणत्याही अडीअडचणी सोडविण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे!’ अशा शब्दांतून कृतज्ञ भावना व्यक्त केली.

यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, माजी अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, ॲड. सतिश गोरडे, सुशील मंचरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक भटेवरा, ॲड. किरण पवार, ॲड. सुनील कडूसकर, ॲड. सुदाम साने, ॲड. मनोहर पवार, ॲड. नितीन कासलीवाल यांनी मनोगते व्यक्त केली. ॲड. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सोहेल शेख यांनी आभार मानले.नियोजन ॲड विक्रम सैनी, ॲड भूषण पाटील, ॲड योगेश मळेवाडी, ॲड अक्षय कदम, ॲड आशिष गोरडे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version