Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र बनसोडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन आज (दि. ५ जून २०२६) करण्यात आले आहे. हा सोहळा आज सायंकाळी ५ वाजता वल्लभनगर, पिंपरी येथील हॉटेल कलासागर येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक म्हणून आमदार अर्जुन उर्फ अण्णा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, विविध काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत नरेंद्र बनसोडे यांचा औपचारिक पदभार स्वीकार समारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नरेंद्र बनसोडे मित्र परिवार आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version