मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि नव्या पिढीपर्यंत त्यांचे कार्य पोहोचविण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ दंतचिकित्सक, समाजसेवक व स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष डॉ. अमित नेमाणे लिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील विधान भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र डॉक्टर सेलचे पदाधिकारी, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा साज लाभला होता.
