देशव्यापी परिषदेत सहभागी होण्यास आवाहन
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्याच्या किल्ल्यातील दीड लाख मुघल सैन्याच्या वेढ्यातून केलेल्या ऐतिहासिक सुटकेचा गौरव करण्यासाठी “विश्वभूषणराजे शिवछत्रपती विशेषता परिषद” चे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद रविवारी 17 ऑगस्ट 2026 रोजी आग्रा येथील एम.जी. रोडवरील सूरसदन येथे सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा प्रवक्ते
विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा आयोजन समितीचे जनार्दन महाराज पाटील यांनी दिली.
आळंदी येथे या परिषदेच्या निमित्त प्रचार,प्रसार करण्याचे अनुषंगाने चेतना यात्रा वाहन पूजन पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते झाले. यावेळी तुकाराम महाराज ताजने, विश्वंभर पाटील, विश्वकर्मा महाराज पांचाळ, रामचंद्रकाका कुऱ्हाडे, तानाजी कुऱ्हाडे, अर्जुन मेदनकर, हमीद शेख, गौतम पाटोळे, संदीप रंधवें आदी मान्यवर उपस्थित होते. चेतना यात्रा आग्रा येथील परिषद या अखिल भारतीय सोहळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे.
परिषदेचा मुख्य उद्देश “विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा” अंतर्गत आयोजित या परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे – “शिवछत्रपतींचे चरित्र हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर विश्वासाठी एक तेजस्वी दीपस्तंभ आहे. अन्याया विरुद्ध लढा देऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या या राष्ट्रपुरुषाचा आदर्श युवा पिढी समोर ठेवणे”. या साठीच “स्वाभिमानियों चले आग्रा” अशी साद शिवप्रेमींना घातली जात आहे.
व्यवस्था व नियोजन आयोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजीव कुमार, मुख्य संयोजक तथा प्रवक्ते जनार्दन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी 35 हजाराहून अधिक शिवप्रेमींच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. परिषदे पूर्वी तीन ते चार दिवस आधी आलेल्यांसाठी ताजमहाल व मथुरेचे दर्शन घडवण्यात येणार आहे. परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवर विलास तात्या बालवडकर, राहुल चव्हाण, प्रकाश तात्या काळे अर्जुन मेदनकर आदी मान्यवर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिवप्रेमींनी नोंदणी साठी 99311 72353 / 9931972353 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समिती तर्फे मुख्य संयोजक तथा प्रवक्ते
विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा आयोजन समितीचे मुख्य संयोजक जनार्दन महाराज पाटील यांनी आवाहन केले आहे. यावेळी विश्वभूषणराजे शिवछत्रपती चेतना यात्रा आयोजन समितीचे मुख्य संयोजक जनार्दन महाराज पाटील यांचा समस्त आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी जनहित फाउंडेशन यांचे तर्फे समिती अध्यक्ष प्रकाश काळे, अर्जुन मेदनकर, विश्वंभर पाटील, आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, रामचंद्रकाका कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, राजेश नागरे, तानाजी कुऱ्हाडे, विश्वंभर पाटील, तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पाटील, राम गोरे आदींनी स्वागत सत्कार करून चेतना यात्रा प्रमुखांचे आळंदीस साजेल असेल आदरातिथ्य करून चेतना यात्रेचे निमित्त आणि आग्रा येथील उपक्रमात निश्चित सहभागी होणार असल्याचे सांगत निमंत्रण स्वीकारले.
