Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज आनंदधाम येथे दहावी व बारावी च्या सकल जैन समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह व करियर गायडन्स कार्यक्रमात शेकडो विद्यार्थी , पालकांचा मोठ्या संख्येत सहभाग झाला.

आचार्य भगवंत श्री आनंदऋषी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषी महाराज, प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषी महाराजांच्या सत प्रेरणेने वीर सेना व श्री तिलोक रत्न जैन स्था.परीक्षा बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीआलोकऋषिजी म. यांनी मंगलाचरण, नवकार मंत्राचा जप ,आनंद धूनचाजप केला. कुमारी दिया गांधी यांनी डॉ अशोकजी पगारिया यांचा बायोडाटा वाचून दाखवला, तसेच सर्वांचे स्वागत केले.
   सीए डॉ अशोककुमारजी पगारिया यांनी सांगितले की मनात जे कोणतेही करिअर ठरवाल आणि ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम कराल, तर तुमचे ध्येय निश्चितच साध्य होऊ शकते. आता तुम्ही कोणतेही करिअर निवडा, त्यासाठी इतकी मेहनत करा, इतका अभ्यास करा की तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

ज्या क्षेत्रात तुम्हाला रुची आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, त्याच अभ्यासक्रमाची निवड करणे तुमच्या यशासाठी अधिक उपयुक्त ठरेल. कारण त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास तुम्ही मनापासून, आवडीने आणि सातत्याने कराल आणि यश संपादन कराल.
विज्ञान शाखेत डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर कायदा, वकिली, पायलट अशा अनेक करिअरच्या संधी तुमच्या पात्रतेनुसार उपलब्ध आहेत.
वाणिज्य शाखेत सीए, सीएस, कॉस्ट अकाउंटंट, एमबीए, सीएफए, एलएलबी, फॉरेन्सिक अकाउंटिंग व ऑडिटिंग यांसारख्या संधी उपलब्ध आहेत.

कला शाखेत बी.ए., एम.ए., एलएलबी तसेच यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी बनता येते. तसेच परदेशी भाषा पदवी अभ्यासक्रम, पायलट, एअर होस्टेस, चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक यांसाठीही विविध डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
तुम्ही कोणतेही करिअर निवडा, ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि बुलंद हौसला आवश्यक आहे.
एका शायरने अगदी योग्य म्हटले आहे—
” मंजिले उन्हींको मिलती है, जिनके सपनों में जान होती है l
उड़ान केवल पंखोंसे नहीं दोस्तों ,
हौंसलों से होती है l l ”
श्री आलोकऋषी महाराज साहेबांनी युवा वर्गाला तीन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या : – संस्कार ,संघटन आणि सेवा. त्यांनी सांगितले .

जहा संघटन होता है ,वहा शक्ती होती है |
जहा सेवा होती है वहा श्रद्धा होती है और
जहा धर्म होता है ,वहा मानता का कल्याण होता है | |
डॉक्टर अशोक पगारिया , सचिन डागा पत्रकार पंकजजी गुंदेचा , दीपक कासवा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रतिलाल कटारिया, संतोष गांधी , मदन मुनोत तसेच लता बोरा , मनिषा मुनोत ,सुशिला बाफना आदींची उपस्थिती होती. दहावी व बारावी विशेष गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जैन विश्व या वेबसाईटचे विमोचन व वीर सेना लोगोचे विमोचन महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी महाराज साहेब यांच्या सानिध्यात झाले. यश चोरडिया, अथर्व पिपाडा, रियागांधी , दिया गांधी,अंकुश चव्हाण, स्वराज गांधी इत्यादींनी कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी खूप मदत केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version