Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता, समन्वय आणि कार्यक्षमता राखण्याच्या दृष्टीने विविध विभागांतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या अभिलेख कक्षाच्या प्रशासन अधिकारी उमा दरवेश यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमण यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक दत्ता सूर्यवंशी यांच्याकडे क्रीडा विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा तर स्थानिक संस्था कर विभागाच्या कार्यालय अधीक्षक सरिता मारणे यांच्याकडे फ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामकाज सुरळीत, गतिमान आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यासाठी हे अतिरिक्त कार्यभार वाटप करण्यात आले असून, त्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यास मदत होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version