Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौक, पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे,सुप्रिया चांदगुडे, माजी नगर सदस्य राजू दुर्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक खरात तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

तर सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आमदार शंकर जगताप, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नगरसदस्य हर्षल ढोरे,नगरसदस्या तृप्ती कांबळे, उज्वला ढोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापूरे, सूर्यकांत गोफणे, माजी नगरसदस्या उषा मुंढे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज स्वप्नीलराजे होळकर तसेच अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष नवनाथ बीडे यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version