Spread the love

कासारवाडी जैन स्थानकामध्ये ​संस्कार भारती वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. आणि पद्मश्री प. पू. चंदनाजी म. सा. यांना भावपूर्ण श्रद्धांजली

​कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रमणसंघीय उपप्रवर्तिनी प. पू. प्रियदर्शनाजी म. सा. यांच्या संथारा पूर्णाहुती दिनाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त कासारवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने २२ मे रोजी जैन स्थानकामध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये धार्मिक प्रार्थना आणि नवकार महामंत्र जाप करून महासतींना वंदन, नमन अभिवादन करण्यात आले.

​तसेच नुकतेच देवलोकगमन झालेल्या महासाध्वीं संस्कार भारती वाणीभूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. आणि वीरायतनच्या प्रमुख पद्मश्री चंदनाजी म. सा. या दोन्ही साध्वींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. सभेत संघाचे अध्यक्ष विलास कुमार पगारिया दापोडी संघाचे अध्यक्ष दिलीप भन्साळी पिंपळे गुरवचे मा. अध्यक्ष प्रा. सुरेश धाडिवाल तसेच जैन कॉन्फरन्स जैन भवन योजनेचे अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया जैन महासंघाचे संदीप फुलफगर आदिनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी पिंपळे गुरव संघाचे अध्यक्ष राजेंद्र कर्नावट सांगवीचे अध्यक्ष रमणलाल शिंगवी आणि पिं. चिं. जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया तसेच सुशील बहु मंडळ, पार्श्वनाथ युवक मंडळ सदस्य आणि जैन श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .​कार्यक्रमाच्या संयोजनासाठी संघाचे अध्यक्ष विलासकुमार पगारिया, स्नेहल भंडारी, संदिप फुलफगर, मयुर पगारिया आदिंनी परिश्रम घेतले.
​शेवटी शांतीलालजी फुलफगर यांनी मंगलपाठ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version