Spread the love

“भाजपचा नेहरू द्वेष हा विकासच्या अपयशातील नैराश्यातूनच” – नरेंद्र बनसोडे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्यागमूर्ती महामता रमाई आंबेडकर यांच्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी कडून त्यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी आदरांजली व्यक्त करताना नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“त्यागमूर्ती महामता रमाई यांच्या त्यागामुळेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर घडले त्यांच्या शिक्षणाच्या कार्यामध्ये कधीही अडथळा न पडू देता संसारचा गाडा एकटीने सामर्थ्याने पुढे आणत माता रमाई ने तमाम बहुजन मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली, स्व स्वार्थाचा त्याग करून त्या आदर्श पत्नी, आदर्श माता आणि खऱ्या अर्थाने महामावला घडविणाऱ्या ठरल्या.
पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नव्या भारताचे निर्माते ठरले. शिक्षण, शेती, विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण विभाग, क्रीडा, संस्कृती, जलनियोजन, विद्यापीठ आयोग, योजना आयोग, दवाखाने, दळणवळण, परराष्ट्र धोरण, व्यापार, रोजगार सर्वच क्षेत्रात भारताला पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले, घरची मोठी श्रीमंती असताना सुद्धा जीवनाची बारा वर्षे जेल मध्ये घालवीत त्यांनी राष्ट्रप्रेम आणि समर्पण दर्शवले म्हणून आज विकसित भारताचे चित्र आपण पाहतो आहोत आज पंतप्रधान मोदी आणि भाजपचे लोक कायम नेहरू यांना दोष देत असतात आणि स्वतःचा नाकर्तेपणा लपवत असतात, भाजपचा नेहरू द्वेष हा विकासाच्या अपयशातील नैराश्यातून आहे. त्यांना विकासाचा इतिहास लपवत नेहरूजींचे चरित्र बदनाम करून खोटा इतिहास जगासमोर आणायचा आहे वास्तविक पाहता माता रमाई आणि पंडित नेहरू जी या दोघांच्या त्यागावर आणि बलिदानाच्या इतिहासावर फार मोठी क्रांती आणि बदल या देशामध्ये घडला त्यांचे कार्य कायम स्मरणीय आणि प्रेरणादायक आहे”

अभिवादन पर मनोगते उमेश बनसोडे, आशिष खरात, नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, माजी उपाध्यक्ष जितेंद्र छाबडा, सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते उमेश बनसोडे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, दयाराम पाटील, कुणाल भोसले, प्रवीण कांबळे, आशिष खरात आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version