Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोरखनाथ गेनबा झोळ यांच्या मातोश्री कै. कृष्णाबाई गेनबा झोळ यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी (दि. २१) रोजी इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिलीप गेनबा झोळ (मुलगा), पिंपरी चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोरखनाथ गेनबा झोळ (मुलगा) आणि प्रमिला बाळासाहेब भापकर (मुलगी) आहेत.

तरी, त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि. ३०) रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version