पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , भारताचे केंद्रीय मंत्री आणि बाभळगाव ते केंद्रीय मंत्री असा दैदिप्यमान प्रवास करणारे, राजकारणातील राजहंस व्यक्तिमत्व, स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या काळातील प्रगतीशील महाराष्ट्र आणि काँग्रेस कार्यकर्त्यांशी असणारी त्यांची नाळ याबाबत कार्यकर्त्यांनी स्मरण केले प्रत्येकाच्या आठवणीतील विलासराव यांचे किस्से या ठिकाणी मनोगताद्वारे सांगण्यात आले.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की विलासराव देशमुख हे व्यक्तिमत्व समस्त कार्यकर्त्यासाठी एक यशाचा पासवर्ड असणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचा मिश्किल स्वभाव तेवढीच संवेदनशीलता तेवढीच जागरूकता आणि तेवढेच पक्ष प्रेम हे आज प्रत्येकाने अंगीकारले तर काँग्रेस पक्षाची जडणघडण अधिक जोमाने झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक लोकभिमुख निर्णय त्यामुळे अनेकांच्या जीवनामध्ये नव्या प्रकाश वाटा खुल्या झाल्या, विलासराव हे नावाप्रमाणेच विलासित व्यक्तिमत्व होते कोणाशीही शत्रू भाव नसणारे पूर्ण स्नेह भाव जपणारे एक उंमदे नेते गेल्याने काँग्रेसचे नुकसान झालेलेच आहे पण त्यांच्या कार्यातून ते कायमस्वरूपी अजरामर आहेत असे बनसोडे म्हणाले.
विलासराव यांच्या आठवणीतील किस्से सांगताना मुंबई येथील त्यांच्या भेटीची आठवण करून देत बनसोडे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबतचे अनेक पैलू कार्यकर्त्यांमध्ये उघड केले.
याप्रसंगी पांडुरंग जगताप, जितेंद्र छाबडा, किशोर कळसकर, नरेंद्र बनसोडे यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सायली नढे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस उमेश खंदारे,स्वप्निल बनसोडे, OBC विभागाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोर कळस्कर, पुणे जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, अनु जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओवाळ, शहर काँग्रेसचे माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, जितेंद्र छाबडा, हरीश डोळस, कबीर मोहम्मद, कुणाल भोसले , सदाशिव तळेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
