Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आवाहन, १६ मे ते १४ जून दरम्यान गणनाकारांच्या भेटीत एसई आयडी देणे आवश्यक

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून, स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांचा एसई आयडी गणनाकारांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. गणनाकारांकडून माहितीची पडताळणी आणि मान्यता झाल्यानंतरच ‘घर-यादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे.

स्व-गणना पोर्टलवर नागरिकांनी सादर केलेली माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात सुरक्षित सरकारी सर्व्हरवर संग्रहित केली जात आहे. या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या संकेतस्थळांपासून सावध राहून केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहनही देखील त्यांनी यावेळी केले आहे.

आयुक्त तथा प्रथम जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सुलभ करण्यासाठी गणनाकारांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version