Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा संयमाने वापर करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आज स्वतःच्या वाहनाऐवजी मेट्रोने प्रवास करत इंधन बचतीचा संदेश दिला.

महापालिकेत जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर टाळत त्यांनी मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी नागरिकांनाही सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.

प्रशांत शितोळे म्हणाले की, “सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात इंधन बचत ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यांचा विचार करून आपण वैयक्तिक वाहनांचा वापर कमी केला पाहिजे. शक्य तिथे मेट्रो, PMPML यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे.” दरम्यान, इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version