Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रा. प्रवीण विलास जावीर यांना Savitribai Phule Pune Universityच्या मराठी विभागामार्फत विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे बहिःस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच मौखिक परीक्षेचे अध्यक्ष म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी काम पाहिले. संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. शांताराम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, खिलारे सर, जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रपरिवार आणि नातेवाईक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version