Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. 40. 7 कमाल तापमानाची नोंद झाली. वाढलेल्या तापमानामुळे शहरवासीयांना घाम फुटला आहे. दिवसभर उन्हाच्या झळा आणि रात्री घामाघूम अवस्थेमुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

नागरिक उष्णतेची लाट ओसरण्याची वाट पाहत आहेत. सकाळी नऊ वाजताच उन्हाच्या काहिलीने नकोसे वाटत आहे. दहानंतर कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. नागरिकदेखील दुपारी कामे करणे शक्यतो टाळत आहेत.

सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांची घामाघूम अवस्था होत आहे. सतत पंखे, कुलर यांची हवा देखील दमट वाटत आहे. नागरिक गारव्याच्या शोधात उद्याने, मोकळी मैदाने आणि तलावासारख्या ठिकाणी गर्दी करत आहेत.सावलीमध्ये बसणाऱ्यांनादेखील उन्हाच्या तीव झळा लागत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. तापमान 38 ते 40 अंशाच्या दरम्यान असल्याने दुकानचालकदेखील दुपारी दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य देत आहेत.

नागरिक उन्हामध्ये बाहेर पडताना स्कार्फ, टोपी, गॉगल, छत्री यांचा वापर करत आहेत. थंड पेयांना मागणी वाढली आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी थंडावा देणारा आहार आणि पेयांचा आधार घेतला जात आहे. सुती, पांढऱ्या, हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version