चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंगारकी चतुर्थी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाने ‘चिंचवडचा राजा’ गणपती मंदिरात आयोजित केलेला मोगरा महोत्सव व चंदन उटी सोहळा’ मोरया भक्त व चिंचवडकर नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
अंगारकी चतुर्थी निमित्त चिंचवडचा राजा गणपतीची महाआरती सामाजिक कार्यकर्ते उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक राहुल कलाटे, ॲड. रोहन जमादार माळवदकर, नगरसेवक मंदार देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, कुणाल लांडगे, मंडळाचे आधारस्तंभ विठ्ठल सायकर, ॲड.सुनिल होनराव, संजय संगमनेरकर, हेमंत डांगे, महेश लांडगे, सोमेश चव्हाण, राजेश शिरोळे, सुहास पोफळे कार्याध्यक्ष महेश मिरजकर, ॲड.विपुल नेवाळे यांसह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते योगेश मिरजकर, अविनाश तिकोने, आदित्य मिरजकर, आनंद सायकर, हर्षल मिरजकर, प्रथमेश रत्नपारखी, संजय कारेकर, दुर्गेश मिरजकर, श्रेयस सायकर, अक्षय जाधव, विशाल गावडे, रोहन जाधव, आकाश जमदाडे, सतीश देशमुख, विशाल भदे, सुयोग चाळके, प्रमोद चाळके, शुभम पोरे, प्रतीक मिरजकर, चैतन्य आहेर, मुकेश चौधरी, धनंजय शालिग्राम यांच्यासह मोरया भक्त व चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अंगारकी चतुर्थी निमित्त दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले यांत प्रामुख्याने बाळासाहेब पंढरपुरे गुरुजी व ब्रह्मवृंद यांनी श्री गणेश सहस्रावर्तने व इत्यादी धार्मिक विधी पार पाडले.
सायंकाळी रात्री उशिरापर्यंत सुमारे ४००० पेक्षा जास्त मोरयाभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
