Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यात नुकत्याच नसरापूर आणि चाकण येथे घडलेल्या बाल लैंगिक अत्याचार आणि निर्घुण खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ आणि हे रोखण्यात निष्क्रिय भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने भीमसृष्टी स्मारकासमोर पिंपरी चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे या राज्यात महाराष्ट्र दिनी अशा घटना होणे अत्यंत क्लेशशदायक आहे.
राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री पाहिजे आणि पोस्को न्यायालयांची अधिक निर्मिती व्हावी हे न झाल्याने अशा घटना वाढत असल्याचे, तसेच हे भाजप सरकार नाकर्ते असल्याचे, बनसोडे म्हणाले.

याप्रसंगी बोलताना संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे म्हणाले शिवरायांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिक्षांचा अंमल होता त्या पद्धतीने आज चौरंगा करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि ही गरज या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळेच निर्माण झाली आहे या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जेवढ्या लवकर या आरोपीला फाशी दिली जाईल चांगला संदेश जाईल असे काळे म्हणाले.

ज्येष्ठ समाजसेवक पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे म्हणाले, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त अशी घटना होणे हे आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणे आहेत जोपर्यंत आपण आपल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या जाणून या व्यवस्थेला प्रशासनाला धारेवर धरत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मिटणार नाही आणि तोपर्यंत अशा घटना होत राहतील त्यामुळे याचे मूळ समजून त्या मुळावर घाव घालणं गरजेचे आहे असे कांबळे म्हणाले.

काँग्रेस पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व सर्व समविचारी पुरोगामी संघटना पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी भाजप सरकार विरोधात, आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी, पोस्को न्यायालयांच्या मागणीसाठी, पूर्णवेळ गृहमंत्र्यांच्या मागणीसाठी, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलन प्रसंगी नरेंद्र बनसोडे, सतीश काळे, समरीन कुरेशी, गिरजा कुदळे, कल्पना गीते, सोमनाथ शेळके, अभिमन्यू दहिफुले, जितेंद्र छाबडा आणि मानव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विष्णुपंत नेवाळे, गिरिजा कुदळे, अभिमन्यू दहीतुले, प्रदेश युवक काँग्रेसचे उमेश खंदारे, सत्यजित बिरादर, दक्षिण भारताचे मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, कल्पना गीते,आबासाहेब ढवळे, वसंत पाटील,अशोक सातपुते अनिल कारंजेकर ,दिलीप कैतके, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कदम,जिजाऊ ब्रिगेड सुलभा यादव, मोनिका भोसले, कौशल्या जाधव, शितल मोरे सोनिया दिलपाक, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी महासंघाचे आनंदा दादा कुदळे सोमनाथ शेळके, हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, राजन नायर, बाबा गायसमुद्रे, जितेंद्र छाबडा, सार्थक बाराथे, मयूर रोकडे, पांडुरंग जगताप, भास्कर नारखेडे, राजेंद्र काळभोर, रफिक कुरेशी आदी पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्त उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version