Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ ही सामाजिक संस्था सुमारे पस्तीस वर्षांपासून जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करीत असून व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी क्रांतिवीर चापेकर, चिंतामणी आणि जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. आज गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त ह. भ. प. भावार्थ देखणे यांना धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याबद्दल(चिंतामणी पुरस्कार), विद्याकर्म आणि अग्निकर्म तज्ज्ञ डाॅ. चंद्रकुमार देशमुख यांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील साहसपूर्व कार्याबद्दल (क्रांतिवीर चापेकर पुरस्कार) आणि सामाजिक कार्यकर्त्या लता टाकळकर यांना (जिजाऊ पुरस्कार) प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप राहील, अशी माहिती गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version