Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण कंपनीच्या पिंपरी विभागाकडून तातडीच्या दुरुस्ती व देखभाल कामांमुळे उद्या दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

यामध्ये वाघेरे फिडर, जाधवकर वस्ती फिडर, पिंपरी फिडर, श्रीनगर फिडर, गणेशम फिडर तसेच मिरास पार्क फिडर परिसरातील अनेक सोसायट्या, रस्ते व व्यापारी भागांचा समावेश आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पिंपरी विभाग यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version