Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा प्रारंभ रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ पासून होत असून चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल.

छत्तिसाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या जिजाऊ व्याख्यानमालेमध्ये रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी अमृता चांदोरकर ‘जे मागाल ते मिळेल’ (मनातील लहरी कसे काम करतात?) या विषयावर प्रथम पुष्पाद्वारे विचार मांडतील. सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी प्रा. डॉ. संजय चौधरी ‘संतांच्या संगती’ या विषयाच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधतील. मंगळवार, दिनांक २८ एप्रिल रोजी संदीप तापकीर ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील. बुधवार, दिनांक २९ एप्रिल रोजी डॉ. सागर देशपांडे ‘आदर्शांच्या शोधात’ या विषयावर चतुर्थ पुष्प गुंफतील; तर गुरुवार, दिनांक ३० एप्रिल रोजी डॉ. भावार्थ देखणे ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या विषयावर अंतिम पुष्पाची गुंफण करतील. दरम्यान गुरुवारी सायंकाळी चिंतामणी, क्रांतिवीर चापेकर आणि जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या सर्व व्याख्यानांचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे, व्याख्यानमाला समन्वयक सुहास पोफळे, संयोजक अमित चौधरी, महेश गावडे, धीरज गुत्ते आणि चंद्रशेखर स्वामी यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version