Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ‘आप युवा आघाडी’ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्र २१ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

राज्यातील तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
अ.क्र. नाव पद
१. मोईन इजाज मोकाशी प्रदेश कार्याध्यक्ष
२. चेतन श्रीनिवास मच्चा प्रदेश कार्याध्यक्ष
३. उमेश निवृत्ती मेटकर प्रदेश कार्याध्यक्ष
४. प्रणित राजेंद्र डोंगरे प्रदेश कार्याध्यक्ष
५. अमर दिलीप गांगुर्डे प्रदेश कार्याध्यक्ष
६. ऋषिकेश पिराजी कानवटे प्रदेश उपाध्यक्ष
७. प्रदीप गणपतराव थोरवे प्रदेश उपाध्यक्ष
८. पुजा बाळकृष्ण गुरव प्रदेश उपाध्यक्ष
९. शुभम ज्ञानेश्वर चव्हाण प्रदेश सचिव
१०. सुचना शैलेश गजभिये प्रदेश सचिव
११. अनिकेत दत्तात्रय खताळ प्रदेश संघटन मंत्री
१२. विकास संभाजी पाटील प्रदेश संघटन मंत्री
१३. नीरज कुमार प्रजापति प्रदेश समिती सदस्य
१४. राहुल पंडित मुदनोर प्रदेश समिती सदस्य
या नियुक्त्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी प्रकाशजी जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे आणि युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रविराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदन केले असून, आगामी काळात राज्यातील युवकांचे संघटन करून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आक्रमकपणे काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version