पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांनी नागरिकांसाठी मोफत विमा वितरण अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष अभियानात पिंपरी चिंचवडमधील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोफत विमा वितरणासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे – दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स – घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे.
मोफत विमा वितरणाचा कार्यक्रम सोमवार, २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित केला असून, ठिकाण भाजपा शहर कार्यालय, एम.एस.आर कॅपिटल, मोरवाडी, पिंपरी असे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल:
दिनेश दिवान काटे, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) – 9881747780
हिना मेहबूब मुलाणी, उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) – 7028702630
संयोजक: दिनेश लालचंद यादव, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा).
भाजप युवा मोर्चाने नागरिकांना या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
