पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील ज्येष्ठ समाजसेवी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या जैन भवन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ,पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, पार्श्वनाथ क्रीडा मंडळ, आनंद परिवार ट्रस्ट ,महर्षि आनंद सेवा प्रतिष्ठान, ओम जय आनंद डायलिसिस सेंटर, माजी विद्यार्थी संघ, शिवाजी विद्यालय धामणी,रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट पुणे शाखा , पश्चिम भारत सीए स्टुडंट विकासा, लक्ष्मी बॅंक अशा अनेक संस्थांचे संस्थापक,/ अध्यक्ष तसेच बंधुता प्रतिष्ठान,आनंद तीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, , मै भारत हुं फोंडेशन, प्रीतम मेडिकल फाउंडेशन,जितो चिंचवड पिंपरी अशा अनेक संस्थांचे पदाधिकारी,म्हणुन त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. श्री सकल जैन स्थानक वासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत जी कोठारी, निवर्तमान अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल , विद्यमान अध्यक्ष विलास राठोड ,वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केली आहे.
प्रा पगारिया यांच्या ४० वर्षापासून अधिक वर्षांच्या प्रदीर्घ समाजसेवा क्षेत्रातील अनुभवाचे सकल जैन श्रावक संघाला निश्र्चित मार्गदर्शन होईल . ह्या नवीन जबाबदारी च्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना विविध संस्थांच्या शुभेच्छा आहेत.
