Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्ववंदनीय महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भीमसृष्टी स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, संत गाडगेबाबा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.

याबाबत माहिती देताना शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “यंदाचे वर्ष हे ऐतिहासिक महापुरुष विशेष वर्ष आहे, शताब्दी, द्वि शताब्दी, त्री शताब्दी स्वरूपाचे आहे, यंदाचे वर्ष हे महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने यांच्या विचारांचा जागर आणि यांच्या कार्याचा अंगीकार हा मोठ्या प्रमाणात देशाभरातून होणे गरजेचे आहे आणि यांच्या शिकवणीच्या माध्यमातून समाज अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. आज प्राप्त असलेली परिस्थिती ही सामाजिक विषमतेची, जातीय द्वेषाची, प्रांतीय वादाची आणि आर्थिक साम्राज्यवाद विरुद्ध सामान्य जनता अशा पद्धतीची आहे त्यामुळे या व्यवस्थेला बदलून या महापुरुषांच्या मार्गाने जाऊन सत्ता परिवर्तन करून देशाची सत्ता जनसामान्यांच्या हातात पुन्हा देत सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा संकल्प आज महामानवाला अभिवादन करताना आपण करूया आणि सत्ता उलटवून टाकण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया”.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक मोरे, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे सरचिटणीस महादेव वाळुंजकर, काँग्रेस सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते उमेश बनसोडे, काँग्रेसचे युवा नेते विजय ओवाळ, हिराचंद जाधव, जितेंद्र छाबडा, मिलिंद बनसोडे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version