Spread the love
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आम आदमी पार्टीने महाराष्ट्र राज्यातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि युवकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून रविराज काळे यांची ‘आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवक आघाडी’च्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
रविराज काळे यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, जनसंपर्क आणि युवकांमध्ये असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि युवक धोरणाबाबत पक्षाची भूमिका तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना रविराज काळे म्हणाले की: पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात प्रस्थापित राजकारणाविरुद्ध मोठा असंतोष आहे. शिक्षण, रोजगार आणि संधी यांसाठी आम आदमी पार्टी हाच सक्षम पर्याय आहे, हे आम्ही प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवू. राज्याच्या कानाकोपऱ्यात युवक आघाडीचे संघटन अधिक बळकट करणे हे माझे पहिले उद्दिष्ट असेल.”
या निवडीबद्दल पक्षाच्या विविध स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही युवकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version