Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील ‘रुद्रंग’ या संस्थेच्या सहकार्याने रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता भरतमुनी रंगघन सभागृह, कामायनी प्रशाला, चिंतामणी मंदिराशेजारी, निगडी प्राधिकरण येथे अनुसंधान कला संस्था या नूतन नाट्यसंस्थेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या अध्यक्षतेखाली आणि वाशी, नवी मुंबई येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
याप्रसंगी आमदार अमित गोरखे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, चित्रपट निर्माते गणेश शिंदे आणि रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांची प्रमुख उपस्थिती राहील. उद्घाटन सत्रानंतर ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश कोकीळ यांच्याशी निवेदक श्रीकांत चौगुले आणि नाट्य – चित्रपट अभिनेते संदीप साकोरे हे प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधतील. या कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अनुसंधान व रुद्रंगचे सदस्य बाळासाहेब विभूते आणि माधुरी ओक यांनी केले आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version