पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा, अहिंसा पुरस्कार आणि भक्ती संध्या , भक्ती गीत स्पर्धा अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले . महावीर जन्मकल्याणकच्या दिवशी दि ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता ही रॅली सांगवी येथील संस्कृती लॉन येथून निघून सांगवी ,दापोडी, नाशिक फाटा ,पिंपरी, चिंचवडगाव ,बिजलीनगर या ठिकाणी दुचाकी व चार चाकी रॅलीचा समारोप भगवान पार्श्वनाथ चौक या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीर ची प्रतिमा असलेली पालखी अहिंसा पद यात्रेच्या माध्यमातून गदिमा सभागृहापर्यंत भगवान महावीरांच्या जयजयकाराच्या, अहिंसा परमोधर्म च्या घोषणांनी वाजत गाजत नेण्यात आली .
या रॅलीमध्ये हजारो जैन बांधव आणि भगिनी सामील झाल्या. महिलांनी फेटे परिधान केले होते आणि पुरुषांनी टोप्या परिधान केल्या होत्या अहिंसारॅलीचा शुभारंभ चिंचवड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप आणि स्थानीय नगरसेविका यांच्या हस्ते झैंडा फडकावून करण्यात आला. पार्श्वनाथ चौकामध्ये प्रा प्रकाश कटारिया व प्रा सुरेखा कटारिया यांच्या परिवाराने आणि बिजलीनगर संघाच्या सदस्यांनी अहिंसारॅलीचे भव्य स्वागत केले व त्या ठिकाणी उभारलेल्या अहिंसा स्तंभाला सर्वांनी मानवंदना दिली.
यानंतर गदिमा सभागृहामध्ये जालना येथील प्रसिद्ध संगीतकार मेहूल रुपडा यांचा अतिशय भक्तीरसाने ओथंबलेला, भक्ती गीताचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला .यावेळी सर्व भाविक भक्ती रसात न्हावुन निघाले .आणि सर्वांनी आपल्या नृत्याच्या माध्यमातून या भक्तीसंध्येला प्रतिसाद दिला या दरम्यान अहिंसा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित प्रमुख अतिथी प्राईड ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अरविंद जी जैन, दुबई येथील प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवी श्री धीरजजी जैन, स्वागताध्यक्ष किरण भाई शहा ,महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोक कुमार पगारिया , विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया तसेच महासंघाचे सर्व माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, विलास कुमार पगारिया , सुदिन खोत, सुर्यकांत मुथियान, विरेंद्र जैन ,उमेश पाटील आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते हा अहिंसा पुरस्कार संपन्न झाला प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या धर्मपत्नी हभप शालिनीताई देशमुख इंदुरीकर,प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर प्रसिद्ध शिक्षण तज्ञ मनोज देवळेकर आणि प्रसिद्ध मानवसेवी एम ए हुसेन यांना हे अहिंसा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व कार्यक्रमासाठी महासंघाचे कार्याध्यक्ष विजयजी भिलवडे महामंत्री संदीप फुलफगर कोषाध्यक्ष नेनसुख जी मांडोत, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गदिया,रमणलाल शिंगवी,शांती नाथ पाटील , उपाध्यक्ष श्रेणिक मंडलेचा, राजेंद्र कर्नावट, सह कोषाध्यक्ष तुषार मुथा, मंत्री विरेश छाजेड, सुरगोंडा पाटील , प्रचार प्रसिद्धी प्रमुख संदेश गदिया, धीरज नहार ,तसेच सचिन कोगनाळे, स्नेहल भंडारी ,मयुर पगारिया, अभिनंदन छाजेड , देवेंद्र पारख, निखिल मुनोत, शुभम कटारिया,सचिन गांधी, प्रतिकेश गांधी, सौरभ अलासे ,अनिता नहार ,हर्षल लुंकड ,गणराज माकुडे आदिंनी परिश्रम घेतले.
