Spread the love
क्रेसेंडो २०२६ ला  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटचालीत खरेपणाचा  ध्यास धरावा असे आवाहन  प्रसिद्ध अभिनेते,लेखक,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी   व्यक्त केले.  यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुनाजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अँड रिसर्च अर्थात आयबीएमआर यांच्यावतीने आयोजित क्रेसेंडो २०२६  सांस्कृतिक  महोत्सवात  ते विद्यार्थ्यांशी संवाद  साधताना बोलत होते.करिअरच्या प्रवासात केवळ सध्या भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे  जात असतानाच भविष्यातील संभाव्य घटनांचा वेध घेऊन  त्यादृष्टीने आपले व्यक्तिमत्व सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे असेही  प्रवीण  तरडे यांनी  सांगितले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस आणि इन्स्टिट्यूट ऑफ सांस्कृतिक  महोत्सवाला  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद  लाभला.या कार्यक्रमात  आयआयएमएस आणि आयबीएमआरच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी वैयक्तिक व सामूहिक  पद्धतीने गायन,नृत्य,नाट्य सादरीकरणांचे  कलाविष्कार उत्कृष्टरीत्या सादर केले.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणी पर्यंतची धुरा उत्तम पद्धतीने  सांभाळली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला यशस्वी ग्रुपचे मुख्य  मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, यशस्वी ग्रुपचे मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version