Spread the love
पीसीयूमध्ये राष्ट्रीय आयडियाथॉन ३.० संपन्न 
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आपण जुन्या विचारांकडे परत जाऊ शकत नाही, नवकल्पना हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिथे भूतकाळ अडथळा नसून त्यापासून शिकवण घेऊन भविष्य घडवण्याची ताकद या नवकल्पनांमध्ये आहे असा विश्वास टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे यांनी व्यक्त केला.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे राष्ट्रीय स्तरावरील आयडियाथॉन ३.० आयोजित करण्यात आली होती.
      यावेळी टाटा मोटर्स जनरल मॅनेजर डॉ. रंगा श्रीनिवास गुंटी, पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे तसेच डॉ. अनिल महेश्वरी, डॉ. शंकर देवसरकर, डॉ. भारत काळे, डॉ. विजय पाटील, विद्यार्थी, प्राध्यापक आदी उपस्थित होते.
  या आयडियाथॉन ३.० मध्ये देशातील एकूण ४० संघांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी ३० संघ महाराष्ट्रातून तर १० संघ इतर राज्यांतून होते.
     कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की,  नवकल्पना ही केवळ एक कृती नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विकसित होणारी विचारसरणी आहे. आयडियाथॉन सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना नोकरी शोधणाऱ्यांना निर्माते बनवतात. त्यांच्या या विचारांतून पीसीयू चा नवकल्पना आणि उद्योजकता विकसित करण्याचा दृढ संकल्प दिसून आला. सहभागी संघांनी प्रचंड ऊर्जा, जिद्द आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक – व्हिआयटी पुणे (५० हजार रुपये),
द्वितीय क्रमांक – पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) (३० हजार रुपये रोख) आणि तृतीय क्रमांक – डी.जे. संघवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (२० हजार रुपये)
    विजेत्या संघांना प्रशस्तीपत्र, पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
     पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version