पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील तमारा सोसायटी येथे असलेल्या एस.टी.पी. (सीवेज ट्रीटमेंट प्लांट) प्लॉट संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचालींना वेग आला आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अर्चना विनोद तापकीर यांनी पुढाकार घेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान पर्यावरण अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींचा आढावा घेत स्थानिक रहिवाशांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. परिसरातील दूषित पाणी, अस्वच्छता आणि पर्यावरणीय परिणाम याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली.
नगरसेविका तापकीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरीत राबविण्याचे आदेश देण्यात आले.
नगरसेविका अर्चना तापकीर यांच्या तत्पर आणि जबाबदार भूमिकेमुळे रहाटणी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, स्वच्छ व निरोगी वातावरणासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
