Spread the love

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात ” जल के बिना तो भैया काम ना चले”हे पाणी जपून वापरा असा संदेश देणारे पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.

पथनाट्यात भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सौ . वैशाली चौधरी,दिलासा संस्थेचे नंदकुमार कांबळे सहभागी झाले होते.
याप्रसंगी शिवाजीराव शिर्के, तानाजी एकोंडे, श्रीकांत चौगुले, अरुण पवार, बाळासाहेब साळुंके,पांडुरंग सुतार, विकास कोरे, सूर्यकांत कुरुलकर उपस्थित होते.

यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले..
” पाणी हे सर्व जीवसृष्टीसाठी पृथ्वीवरील अमृत आहे. जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पाणी ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यासाठी सर्वांनी ‘ पाणी जपून वापरले पाहिजे. “!
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील म्हणाले “जागतिक जलदिनाच्या दिवशी पथनाट्य या माध्यमातून “पाणी” ही गंभीर समस्या बनत चालली आहे याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा म्हणून प्रबोधन केले आहे.”
आण्णा जोगदंड यावेळी म्हणाले.. “जगातील ३/४ भाग खाऱ्या पाण्याच्या समुद्राने व्यापला आहे. १/ ४ भागात जमीन आणि गोडे पाणी आहे. या पाण्याचा विनियोग जगातील सर्व माणसांनी जपून करावा. पाणी बचत ही काळाची गरज आहे.
पथनाट्य झाल्यावर कवयित्री राधाबाई वाघमारे आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचतीवर कविता सादर केल्या.
पिंपळे गुरव परिसरातील उदय ववले, कल्पना भेलके, राहुल माने, बाळासाहेब देवकर, पवन रंधे, राहुल जाधव, शुभम बेंद्रे,सागर नागुलकर, सुवर्णा कांबळे, विवेक जाविर,काशिनाथ जोशी, शिवाजी कळसे,ऋषिकेश भोई, राहुल चव्हाण, शांतीसागर पाटील,मारुती कांबळे उपस्थित होते. पाणी बचतीची सामूहिक प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणून पथनाट्याची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version