Spread the love

आज  पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे व्याख्यान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वीर शहीद हुतात्मा भगतसिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांचे शुक्रवारी (दि. २० मार्च) सकाळी १० वाजता, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन पिंपरी येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती पिंपरी आर्य समाज चे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर किरणजीत सिंग हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नयन कुमार आचार्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी किरणजीत सिंग आर्यसमाज पिंपरी येथे होम हवन विधी मध्ये सहभाग घेणार आहेत अशी माहिती पिंपरी आर्य समाजचे मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी यांनी दिली आहे.
किरणजीत सिंग हे पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच येत आहेत. या व्याख्यानास आर्य समाज प्रतिनिधी व देश प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version