Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन द्वारे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . अस्पृश्यतेच्या लढ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी रमाबाई यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन , आनंद हास्य क्लब यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे म्हणाल्या , “लग्नाआधी रमा अशिक्षित होत्या, पण लग्नानंतर भीमराव आंबेडकरांनी त्यांना सामान्य लेखण आणि वाचन शिकवले होते, जेणेकरुन त्या स्वत:च्या हस्ताक्षर करत होत्या. डॉ. आंबेडकर रमाला ‘रमो’ म्हणून संबोधत असत तर रमाबाई बाबासाहेबांना ‘साहेब’ म्हणत असत. बाबासाहेब अमेरिकेत होते तेव्हा रमाबाईंनी खूप कठीण दिवस घालवले. रमाबाईंनी या कठीण काळातही कोणतीही तक्रार न करता मोठ्या संयमाने हसून दिवस काढले. डिसेंबर 1940 मध्ये बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी “थॉट्स ऑफ पाकिस्तान” हे पुस्तक लिहिले आणि ते केवळ त्यांची पत्नी “रमो” यांना समर्पित केले. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक चळवळींमधील अनेक चळवळी आणि सत्याग्रहांमध्ये रमाबाईंनी भाग घेतला. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या. दलित समाजातील लोक रमाताईंना ‘आई साहेब’ आणि डॉ आंबेडकर यांना ‘बाबा साहेब’ म्हणून संबोधत असत. त्यामुळे माता रमाई यांचे योगदान अमूल्य आहे .“
राजेंद्रनाथ जस्वाल म्हणाले , “ भीमराव आंबेडकर नेहमीच शिकण्यात गुंतलेले होते. रमाई त्यांच्या कामात अडथळा येऊ नये याची काळजी घेत असायच्या. त्यांनी आपल्या पतीच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेतली. बाबासाहेबांचे वाचन करताना आतून दार बंद करायचे. रमा बर्‍याच वेळा दार ठोठावायच्या पण जेव्हा दार उघडत नसत त्या दमून जात असे. यामुळे त्या अनेकदा उपाशी राहच्या. नवरा भुकेला असताना त्यांनी अन्न घेणे हे त्यांना मान्य नव्हते. माता रमाई अश्या त्यागमूर्ती होत्या . रमाई बाईंचा पाठिंबा नसता तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा महापुरुष समाजासाठी एवढे योगदान कदाचीत देऊ शकला नसता. “

याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक  संजय भिसे, राजेंद्रनाथ जस्वाल, गिरधारी प्रसाद व आनंद हास्य क्लब आणि उन्नती सोशल फाउंडेशन चे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version